मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट मांडण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर केला. अर्थमंत्री सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाही सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. रोजगार, शेती त्यासोबतच उद्योग या क्षेत्रांसाठीही घोषणा जाहीर केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरसंदर्भात मोठी घोषणा केली. यामुळे नवीन करप्रणाली निवडणाऱ्या नोकरदारांना फायदा होणार आहे.
3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. आता नवीन करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली आहे. तर पेन्शनची मर्यादा आता 15 हजारांवरून 25 हजार इतकी वाढवण्यात आली आहे.
तीन ते सहा लाख रुपये उत्पन्न असल्यास आता 5 टक्के कर भरावा लागेल. सात ते दहा लाख रुपये उत्पन्न असल्यास आता 10 टक्के कर असेल तर दहा ते बारा लाख रुपये उत्पन्नावर 15 टक्के, बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्नावर 20 टक्के आणि पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिक जर उत्पन्न असेल तर 30 टक्के कर भरावा लागणार आहे.