भाजप नेते अमित शाह यांनी मध्यस्थी केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा चिढा सुटला असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या चार जणांची नावे फिक्स झाली आहेत. नव्या विस्तारात एकूण 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपत घेणाऱ्या चौघांची नावे फिक्सही झाली आहेत. यात भरत गोगावले, अनिल बाबर आणि योगेश कदम यांची नावं असल्याचे बोलले जात आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. 4-4-2 असा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती आहे.
संजय शिरसाट आणि संजय रायमूलकर या दोघांपैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नसल्याची माहिती आहे.