युनायटेड स्टेट्सचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे COP26 जागतिक परिषदेत असताना ते चालू परिषद मध्ये झोपत असल्याचे दिसून आले. याचा व्हिदिओ Disclose.tv वरती पोस्ट केल्यानंतर हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
१ नोव्हेंबर रोजी बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली त्यांच्या देशाने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांवर भाषण देत होते. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ग्लासगो येथे COP26 जागतिक परिषदेचे आयोजित केले होते आणि त्यामध्ये पर्यावरण प्रदूष कसा रोखता येईल याच्यावर्ती भाषण चालू होते. चालू परिषदेत जो बायडेन हे काही वेळ डोळे बंद करून बसले होते. संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला आहे की जर ग्लोबल वार्मिंग सध्या असाच सुरू राहिली तर ते हवामान आपत्तीला कारणीभूत ठरेल. दरम्यान सर्व नेत्यांनी २१०० पर्यंत ग्लोबल वॉर्मिंग १.५ डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याचे मान्य केले आहे. सध्या २.७ डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे.