राजकारण

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा! राज्यातील लोकसभेच्या 11 जागांवर आज मतदान

Published by : Dhanshree Shintre

देशामध्ये लोकसभा निवडणूक मतदान 7 टप्प्यामध्ये होत असून यातील 2 टप्पे पार पडले आहेत. आज म्हणजे 7 मे रोजी याचा तिसरा टप्पा आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये देशभरात एकूण 1352 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण 94 लोकसभा मतदारसंघांत आज म्हणजेच 7 मे 2024 या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

आजच्या टप्प्यात गुजरात राज्यामध्ये सर्व 26 जागांसाठी मतदान होणार आहे. आसाममधील 4 जागा, बिहार 5 जागा, छत्तीसगड 7 जागा, गोवा 2 जागा, कर्नाटक 14 जागा, मध्य प्रदेश 8 जागा, महाराष्ट्र 11 जागा, उत्तर प्रदेश 10 जागा, पश्चिम बंगाल 4 जागा, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव प्रत्येकी 2 जागा, जम्मू काश्मीर 1 जागा मतदान होणार आहे.

महाराष्टात या टप्प्यात एकूण 11 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, माढा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि सोलापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. बारामती, उस्मानाबाद, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे चार मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. महायुतीसाठी आजची लढत अधिक आव्हानात्मक आहे.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमधील लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ कायम राखणे हे शरद पवार यांच्यासाठी जसे प्रतिष्ठेचे आहे तसेच अजित पवार यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. बारामतीच्या निकालावर अजित पवार यांचे महत्त्व ठरणार आहे.

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...