Eknath Shinde | Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

'शिंदेशाही'वर विधानसभेत शिक्कामोर्तब;भाजप-शिंदे गटाचा बहुमताचा आकडा पार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवस सुरू असलेल्या बंडखोरीनंतर मोठे बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारची आज सकाळी 11 वाजता फ्लोर टेस्ट झाली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये जिंकून सरकारने पहिला विजय मिळवला. तर आज शिंदे सरकारनं हा विश्वासदर्शक ठराव जिंकला असून तब्बल 164 मतांनी त्यांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीला 33 मते मिळाली. तर तीन जणांनी तटस्थ म्हणून मतदान केले.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली असून एकनाथ शिंदे यांनी पहिली लढाई जिंकली. यानंतर शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे. तर, आज होणाऱ्या बहुमत चाचणीला शिंदे सरकार सामोरं गेले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. व भरत गोगावले यांनी त्याला अनुमोदन दिले. यानंतर पार पडलेल्या बहुमताची चाचणीत शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार करत विजयावर शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल 164 मतांसह शिंदे-भाजपनं बहुमत चाचणी जिंकली आहे. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 99 मते पडली. काल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत 107 मते महाविकास आघाडीकडे होती. परंतु, कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सहभागी झाल्याने एक मत कमी झाले. तर, आज कॉंग्रेसचे पाच आमदार अनुपस्थित असल्याने महाविकास आघाडीची गाडी 99 वरच थांबली. याशिवाय समजावादी पार्टीचे तीन जणांनी तटस्थ राहणे पसंत केले.

तर, बहुमत चाचणीसाठी शिवसेनेने व्हीप जारी करण्यात आला होता. परंतु, आजही शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप मोडत महाविकास आघाडीविरोधात मतदान केले. याविरोधात शिवसेनेने सभागृहात विचारले असता सभागृह पटलावर नोंद घेण्यात आली असल्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू