महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला. २ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका मुंबईत पार पडल्या. पहिली बैठक अजित पवार गटाची होती तर दुसरी शरद पवार गटाची.
या बैठकीनंतर वायबी सेंटर येथील बैठकीला मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार उपस्थित होते. पण त्यांनी पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, या बैठकीनंतर २४ तासांतच भुयार यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला. हा शरद पवार यांना मोठा धक्का समजला जातो.