कोल्हापूर : जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच चर्चेत आले आहे. माजी आमदार अमल महाडिक आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एकमेकांना बिंदू चौकात येण्याचं आव्हान दिलं होतं. यामुळे महाडीक-पाटील गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
साखर कारखान्याची निवडणुकीवरुन सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. एका सभेमध्ये सतेज पाटील यांनी व्यासपीठावरून भ्याले...भ्याले... महाडिक भ्याले असं म्हणत त्यांना खुले आव्हान दिलं. सतेज पाटील यांनी दिलेल्या या आव्हानाचा स्वीकार करत श्री राजाराम साखर कारखान्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन मी आज संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्ही देखील डी वाय पाटील साखर कारखान्याची कागदपत्र घेऊन बिंदू चौकात यावं, असं प्रतिआव्हान अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना दिले होते.
तर, महादेवराव महाडिक बिंदू चौकात कधी येणार सांगा ? त्या दिवशी बंटी पाटील नक्की येणार, असे सतेज पाटलांनी म्हंटले आहे. यामुळे महाडिक-पाटील गटाचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.