'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेतील अर्ज राज्यभरात युद्धपातळीवर भरले जात आहेत. कारण, अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे गाव-खेड्यात अंगणवाडी, शासन सेवा केंद्र तसेच ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जात आहेत. आता या योजनेबाबत आनंदाची बातमी समोर येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे पहिले दोन हप्ते रक्षाबंधनापूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेचे पैसे 19 ऑगस्ट रोजी खात्यावर येणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं होते. मात्र, आता 17 ऑगस्टला पहिले दोन हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळं एकप्रकारे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणीला ओवाळणी मिळणार आहे.
या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा केले जातील. या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांची जमा झालेली रक्कम मिळणार आहे. विशेषत: या योजनेचे पैसे मिळण्यासाठी महिलांना जास्त वाट पाहावी लागणार नाही हे स्पष्ट झाले आहे. 17 ऑगस्ट रोजी सरकारने पैसे वाटपाच निर्णय घेतला.