Molestation Team Lokshahi
राजकारण

साताऱ्यात नगरसेवक भिडले; माजी नगरसेविकेला मारहाण व विनयभंग

राज्यात शिवसेना आणि शिंदे यांच्या मेळाव्यात गर्दीसाठी चढाओढ सुरु आहे. तर, दुसरीकडे साताऱ्यात नगरसेवक एकमेकांसोबत भिडले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : एकीकडे राज्यात शिवसेना आणि शिंदे यांच्या मेळाव्यात गर्दीसाठी चढाओढ सुरु आहे. तर, दुसरीकडे साताऱ्यात नगरसेवक एकमेकांसोबत भिडले. भाजप नगरसेवकाने माजी नगरसेविकेला मारहाण करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सातारा नगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक धनंजय जांभळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेविका असलेल्या महिलेला मारहाण करत त्यांचा विनयभंग केला. यावेळी महिलेचे पतीही तेथे उपस्थित होते. सातारा नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी वॉर्डात काम करत असताना हा राडा झाला असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची दखल घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधित महिलेच्या घरी जाऊन विचारपूस केली. सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यात अशा घटना घडणे दुर्दैव असून महिलांना मारहाण करणाऱ्यांना फोडून काढले पाहिजे, असे सांगत याबाबत पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे सांगत उदयनराजेंनी संताप व्यक्त केला.

काय घडले नेमके?

पालिकेचे कर्मचारी आज सकाळी यादो गोपाळ पेठेत रांगोळी काढण्याचे काम करत होते. यातूनच स्वच्छता आणि रांगोळी काढण्यावरून जांभळे यांच्यासह दुसऱ्या माजी नगरसेवकामध्ये वाद सुरू झाला. यावेळी माजी महिला नगरसेविका यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि वाद थांबण्याचा प्रयत्न केला असता जांभळे यांनी माजी नगरसेविकेला मारहाण करत विनयभंग केला. याप्रकरणाची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. या सर्व घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी