राजकारण

Balasaheb Thorat : आरोग्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने राजीनामे द्यावेत

राज्याच्या आरोग्यव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आदेश वाकळे, संगमनेर

राज्याच्या आरोग्यव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? या प्रश्नांची खरी खरी उत्तरे महाराष्ट्राला हवी आहे. सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्रासमोर सत्य मांडावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. राज्याची संपूर्ण आरोग्यव्यवस्था सलाईनवर गेली आहे. आरोग्यमंत्री म्हणतात याला काही मी एकटा जबाबदार नाही, ही संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. याचा अर्थ फक्त आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा होत नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची ही जबाबदारी आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राज्यातली जी शासकीय रुग्णालये आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात फार मोठे काम केले आहे. गरीब माणसाला आधार देण्यात या रुग्णालयांचा मोठा वाटा देखील असल्याचे बाळासाहेब थोरातांनी सांगितले आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Latest Marathi News Updates live: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे