नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर व निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यातील दहा महत्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शिंदेचे बंड अचानक नाही, हे बंड पूर्ण नियोजनबद्ध असल्याचा दावा त्यांनी केला.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
- 21 जूनला झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढलं,
- त्यानंतर त्यांच्याकडून व्हीपचं उल्लंघन
- एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरी यांनी पद
- आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून येतात, पक्षाशी चर्चा करुन निर्णय घेतात
- आमदार केवळ सदस्य, त्यांना पक्षाकडून सूचना मिळतात
- शिंदेचे बंड अचानक घडू शकत नाही, हे बंड पूर्ण नियोजनबद्ध, षडयंत्र
- दहाव्या परिच्छेदानुसार अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंना नोटीस बजावली
- निर्णय प्रलंबित असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात का?
- पक्षाच्या संघटनेत पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे बहुमत आहे.
- राज्यसभेत आमचे बहुमत आहे. मात्र केवळ 40 आमदारांच्या आधारे निवडणूक आयोगाने निकाल दिला.