ठाणे: किरीट सोमैयांच्या आक्षेपार्ह व्हिडीओची बातमी लोकशाहीने समोर आणल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहे. त्यातच आता सोमैयांविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी प्रदर्शन, आंदोलने करण्यात येत आहे.
या व्हिडिओवरून सोमैयांविरोधात आज ठाण्यात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यादरम्यान ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी जोडो मारो आंदोलन देखील करण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.