राजकारण

ठाकरे गटाला गळती सुरूच; केसरकर शिंदेंच्या गोटात सामील

Deepak Kesarkar यांच्यासह तीन आमदार गुवाहाटीमध्ये दाखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले. परंतु, यानंतरही ठाकरे गटाला गळती सुरुच असून दीपक केसकर (Deepak Kesarkar) व रामटेकचे आशिष जैस्वाल हेही गुवाहटीला दाखल झाले आहेत. यामुळे एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) संख्याबळ वाढणार आहे.

उध्दव ठाकरे वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले. यानंतरही एकनाथ शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहेत. आजही दीपक केसकर यांच्यासह चार जण गुवाहटीतील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. यात ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आशिष जैस्वाल, पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेना अजूनही धक्क्यातून सावरत नसल्याचे दिसते.

शिवसेनेने भाजपासोबत जावे, ही आजही माझी भूमिका आहे. यासाठी गेली दोन वर्षे मी प्रयत्न करीत आहे. या संदर्भात आजही चाललेल्या चर्चेत माझा खारीचा वाटा आहे. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरेंनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत दिपक केसरकर यांनी बुधवारी मांडले होते. दरम्यान मला जायचे असेल तर मी आजही जावू शकतो. मला कोणीही अडवू शकत नाही. त्यासाठी "मी" कोणाची दादागिरी खपवून घेणार नाही. मात्र "मी" आजही पक्षाशी प्रामाणिक राहिलो. त्यामुळे मला जाण्यासाठी कोणी भाग पाडू नये, असा टोला त्यांनी लगावला होता. यानंतर आज ते शिंदे यांच्या गटात सामील झाले.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...