राजकारण

ठाकरे गट व शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण; सुप्रीम कोर्टात सुनावणीआधीच मांडली बाजू

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज Supreme Court सुनावणी होणार

Published by : Team Lokshahi

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. परंतु, याआधीच उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाने (Shinde Group) एकमेकांवर कुरघोडी करत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधीच ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केलं आहे. अपात्रतेचा मुद्दा अध्यक्षांकडे पाठवण्यास विरोध ठाकरे गटानं विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांवर निकाल घ्यावा. अपात्रतेचा मुद्दा अध्यक्षांकडे नको. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला अपात्र ठरवावं, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

तर, शिंदे गटाकडूनही सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून 16 आमदारांवरील कारवाई अयोग्य असल्याचे म्हंटले आहे. उपाध्यक्षांनी केलेली कारवाई अयोग्य आहे. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जावे, अशी मागणी शिंदे गटाने न्यायालयाकडे केली आहे.

दरम्यान, बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ आज या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. 27 जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय करणार आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result