तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच एक्झिट पोलने सर्वांच लक्ष वेधलं आहे. 2 वेळा संधी दिल्यानंतर तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलन आणि उपोषण करणाऱ्या चंद्रशेखर राव यांच्या विरोधात बदलाचे वारे वाहत आहेत, असं एक्झिट पोल वरून दिसतंय. 119 पैकी 60 जागा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आहेत. मात्र एक्झिट पोलनुसार बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्या खात्यात ज्या जागा जातांना दिसतायेत त्यानुसार तेलगंणात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे.
2 वेळा संधी दिल्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या विरोधात बदलाचे वारे वाहत आहेत, असं एक्झिट पोलवरून दिसतं. बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्या खात्यात ज्या जागा जातांना दिसत आहेत. त्यानुसार तेलगंणात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी जोरदार रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे.
तेलंगणामध्ये 71.34 टक्के मतदान झालंय. इंडिया टुडेच्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसला 63 ते 73 जागा मिळतील. तर, बीआरएसला 34 ते 44 जागा निवडून आणण्यात यश येईल. पण, भाजपकडे केवळ 4 ते 8 जागा असतील. जवळपास सगळ्याच सर्वेंनी थोड्याफार प्रमाणात असेच कल असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. इंडिया टीव्हीनुसार बीआरएसला 31 ते 47 जागा मिळतील. तर, काँग्रेसला 63 ते 79 तर, भाजपला केवळ 2 ते 4 जागांवर समाधान मानाव लागेल. सर्वच एक्झिट पोलप्रमाणे यावेळी बीआरएसची दमछाक होण्याची शक्यता आहे.