राजकारण

Telangana Election : तेलंगणाच्या सत्तास्थापनेची धुरा महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्यावर; तातडीने तेलंगणासाठी रवाना

Published by : Siddhi Naringrekar

तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच एक्झिट पोलने सर्वांच लक्ष वेधलं आहे. 2 वेळा संधी दिल्यानंतर तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलन आणि उपोषण करणाऱ्या चंद्रशेखर राव यांच्या विरोधात बदलाचे वारे वाहत आहेत, असं एक्झिट पोल वरून दिसतंय. 119 पैकी 60 जागा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आहेत. मात्र एक्झिट पोलनुसार बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्या खात्यात ज्या जागा जातांना दिसतायेत त्यानुसार तेलगंणात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे.

तेलंगणात काँग्रेसचा शंभर टक्के विजय होईल, असे बऱ्याच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते. तसं न झाल्यास महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे एमआयएम. 7 आमदार असलेली एमआयएम यावेळी 9 जागा लढवत आहे. एक्झिट पोलनुसार निकाल लागले तर, कोणत्याचं पक्षाला बहुमत मिळणार नाही अशी परिस्थितीत सत्ता स्थापनेचा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षाची मदत घ्यावी लागेल. भाजप किंवा काँग्रेसला एमआयएम साथ देणं अशक्य आहे. बीआरएस आणि एमआयएम यांच्या पडद्यामागून सामंजस्य असल्याचे तेलंगणाच्या राजकारणात बोलले जाते. बीआरएस काठावर पास झाली तरी एमआयएमबरोबर असल्यास सत्ताबदलाच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आणि भाजपचा खेळ बिघडू शकतो.

याच पार्श्वभूमीवर आता तेलंगणातील सत्तास्थापनेची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला