राजकारण

तेजस ठाकरेंची राजकीय एन्ट्रीचा मुहुर्त ठरला? दसरा मेळाव्याच्या बॅनरवर फोटो

पुन्हा एकदा तेजय ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरु

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दसरा मेळव्यावरुन राज्यात सध्या घमासान सुरु असून शिवसेना आणि शिंद गट आमने-सामने आले आहेत. शिवाजी पार्कसाठी दोन्ही गट आक्रमक असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी मिळाली आहे. परंतु, शिवसेना अद्यापही मैदानापासून वंचित आहे. तरी परवानगी मिळो अथवा न मिळो शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेणार असल्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. यासाठी शिवसेनेने तयारी सुरु केली असून पोस्टरही लावले आहेत. या पोस्टरवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरे यांचाही फोटो दिसत आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला अद्याप मैदानासाठी वेटींगमध्ये आहे. परंतु, दुसरीकडे शिवसेनेने शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी तयारी सुरु केली असून पोस्टर लावण्यात येत आहे. यावर चालो शिवतीर्थचा नारा देण्यात आला आहे. तसेच, हिंदुत्वाची वज्रमुठ आता ताकद दाखवणारच! गद्दारांना क्षमा नाही, असा इशारादेखील शिंदे गटाला देण्यात आला आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे यांचाही फोटो दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तेजय ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर, तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री करण्यासाठी शिवसेनेनं दसरा मेळाव्याचा मुहुर्त काढला की काय?, अशा चर्चा सुरू आहेत.

याआधीही तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाच्या शक्यता वर्तविण्यात येत होत्या. ते कोल्हापूरच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी कार्ला गडावर जाऊन एकविरा देवीचे दर्शन घेतले. यामुळे तेजस ठाकरे यांची राजकारणात एंन्ट्री होऊ शकते. राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यांसारख्या नेतृत्वातून युवासेना तयार झाली आहे. यामुळे युवासेनेचे नेतृत्व तेजस यांच्यांकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुंबईत आज शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आहे. यादरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. तर, आजच्या मेळाव्याला दसरा मेळाव्याचा ट्रेलर म्हणूनही संबोधण्यात येत आहे.

LPG Price Hike: ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका! गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; जाणून घ्या दर

दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल

IPL Retention 2025: चार कर्णधारांना धक्का, रोहित शर्मा मुंबईत कायम?

अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून होणार सुरुवात