लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबत अमोल कोल्हे, शशी थरुर, मनिष तिवारी, डिंपल यादव यांचेही निलंबन करण्यात आले आहे. लोकसभेत जवळपास 49 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. खासदारांच्या निलंबनानंतर लोकसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. संसद घुसखोरी प्रकरणावर चर्चेची मागणी केल्याने निलंबन केल्याची माहिती मिळत आहे.
सुप्रिया सुळे
अमोल कोल्हे
शशी थरूर
सुदीप बंदोपाध्याय
डिंपल यादव
मनीष तिवारी
मोहम्मद फैसल
कार्ती चिदंबरम
दानिश अली
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेतून खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. लोकसभेत गोंधळ घातल्याबद्दल निलंबन करण्यात आले.