पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे प्रकरणी संजय शिरसाट यांना पोलिसांची क्लीन चिट मिळाली आहे. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांना क्लीन चिट कशी दिली हे मला समजेल का? तुम्ही वकील आहात मला, जरा समजून सांगाल का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. महिला आयोगाकडे अहवाल न पोचताच तो आरोपीकडे कसा? यासंबंधी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही अंधारेंनी केली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मी ठरवून ब्रेक घेतला होता. आठ दिवसात अनेक विषय घडले. संजय शिरसाटांना क्लीन चिट दिली असं समजलं. या प्रकरणासंबधी मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललं पाहिजे. संजय शिरसाट यांना क्लीन चिट कशी दिली हे मला समजेल का? तुम्ही वकील आहात मला, जरा समजून सांगाल का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. गृहमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळेच शिरसाट यांना क्लीन चिट दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
गृहमंत्री फडणवीस सतेच्या बाजूने बोलतील. पण, वकील म्हणून फडणवीस कायद्याच्या बाजूनं खर सांगतील असं मला वाटतं. या प्रकरणात माझी बाजू ऐकून का घेतली नाही? मला कुठेही चौकशीसाठी बोलावलं नाही. बाजू मांडण्याची मला संधी दिली नाही. मला कोणतीही नोटीस दिली नाही. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहिजेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, आम्हाला न्याय मिळणार नाही हे आम्हाला माहित होते. क्लीन चिट मिळणार हेही माहित होते. मला न्याय मिळेल ही अपेक्षा कमी होती. तरीसुद्धा न्यायालयीन लढाई लढत राहील, असा निर्धार सुषमा अंधारेंनी केला आहे. माझा संपूर्ण पक्ष माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.