उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील गडकरी रंगायतन इथं होत असलेल्या सभेत मोठा राडा झाला आहे. ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दोन्ही गटाचे लोकं एकमेकांसमोर आले आहेत. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावरच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, तुम्ही बांगड्या फेकल्या म्हणजे फार मोठा पराक्रम दाखवला का? अख्या मराठवाड्यात राज ठाकरेला फिरायला लोकांनी जागा ठेवली नाही जाल तिथे नाकेबंदी केली, तुम्हाला तुमचा दौरा गुंडाळावा लागला, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदें ज्या बहिणीला लाडकी बहीण म्हणता आणि त्याच बहिणीच्या हातातल्या बांगड्याना कमी समजता, म्हणजे तुमचं प्रेम बेगळी आहे, तुम्ही महिलांचा सन्मान करत नाही, बांगड्या फेकल्या म्हणजे आम्ही विचलित होऊ असं काही नाही श्री शक्तीचा सन्मान म्हणजे बांगड्या आहे, ज्यांनी हे हॉलच्या बाहेर नाटक केलं त्यांना प्रश्न आहे की मराठवाड्यात तुम्हाला काय झालं होतं? विदर्भात काय झालं होतं ठाण्यात कसं काय आठवलं?
दरम्यान, कालच बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याआधी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरे यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. यावेळी उद्धव ठाकरेंची सभा देखील उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता.