राजकारण

'नीतू अन् नीलू प्रचंड आगाऊ, नारायण राणेंनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही'

भाजप नेते नितेश राणे यांना सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचा एक जुना व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला होता. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना पक्षात घेऊन बाळासाहेबांबरोबर गद्दारी कुणी केली, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला होता. याला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले आहे. आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ आहे. तो व्हिडिओ जुना आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी आरोप करत नाही, टीका करत नाही. कुटुंबात काय चुकलं हे विचारण्याचा बहीण म्हणून अधिकार विचारते. भाऊ किती उर्मट झाले हे माध्यमे बघत आहे. भाजपच्या वळणीला गेल्यानंतर त्यांचे संस्कारहिन झाले आहेत. गुलाबराव पाटील यांचा माज तसेच अब्दुल सत्तार यांची भाषा बदलली. सुहास कांदे नाराज, संभाजी नगरला संजू भाऊ नाराज आहेत. कामाख्या देवीला अब्दुल सत्तार का नाही गेले, वंदनीय बाळासाहेब यांचा शिवसैनिक महिलांचा अनादर करणारा असू शकत नाही, असा टोला त्यांनी सत्तारांना लगावला आहे. किरीट सोमय्या यांनी कागदपत्रे काढून काहीच मिळत नाहीये. किरीट सोमय्या यांना एखादं मंत्री पद तरी द्यावं, असा चिमटादेखील त्यांनी काढला आहे.

नितेश राणे यांनी सुषमा अंधारेंचा एक जुना व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला होता. यालाही सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले आहे. आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ आहे. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही. तो व्हिडिओ जुना आहे. विचारांचं खंडन मंडन करावं लागतं. त्यांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, असा समाचार अंधारेंनी घेतला आहे.

तर, रामदेव बाबांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वच स्तरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. मात्र, काही लोक महिलांचा अपमान करूनही गुन्हा दाखल होत नाही. रामदेव बाबा यांच्यासोबत अमृता वहिनी होत्या तरीही त्या काहीही बोलल्या नाही. मी असते तर तिथेच खडसावले असते, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, गृहमंत्री म्हणून फडणवीस कुचकामी आहेत. सगळे खाते फडणवीस यांच्याकडे आहे, याचा अर्थ भाजपच्या इतर लोकांना अक्कल नाही का? देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहे का, देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष हटत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha