राजकारण

कोणतीही गाव कर्नाटकात जाणार नाहीत, तर उचलून नेणार का : पालकमंत्री

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत आहे. यावरुन राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोणतीही गावे कर्नाटक मध्ये जाणार नाहीत, असा विश्वास सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जर गावे जाणार नसतील, तर काय उचलून नेणार आहे का, असा टोला पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोईप्पा यांना लगावला आहे.

जत तालुक्यातील कोणतीही गाव कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नाहीत. सदरचा ग्रामपंचायतीचा ठराव हा 2013-14 मधील आहे. मात्र, आता त्या ग्रामपंचायत विलीन देखील झाल्या आहेत. जो पाण्याचा प्रश्न होता. तो बऱ्यापैकी मिटलेला आहे. सात टक्के भागामध्ये पाणी पोहोचलेला आहे आणि उर्वरित 40 टक्के भागात लवकरच पाणी पोहचेल, असे त्यांनी सांगितले.

आपण दहा वर्ष जत तालुक्याचे आमदार म्हणून काम केलं आहे. त्यामुळे आता देखील या गावातील कोणीही कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नाहीत. तरी देखील या प्रश्नांवर जत तालुक्यात आज तातडीने जाऊन सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हंटले कर्नाटकचे मुख्यमंत्री?

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं. याशिवाय महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत त्या शाळांचा विकास कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणामार्फत निधी दिला जाणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result