राजकारण

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बीएमसी खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आले आहे. यानंतर सूरज चव्हाण यांना विशेष कोर्टामध्ये हजर केले होते. याप्रकरणी कोर्टाने सूरज चव्हाणांना 22 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी सूरज चव्हाणांचे वकील दिलीप साठले म्हणाले की, आम्ही कोर्टाला सांगितले की सुरज चव्हाण यांचा या घोटाळ्यात सहभाग नाही. एफआयआरमध्ये सूरज चव्हाण यांचे नाव नाही. फक्त सूरज चव्हाण उत्तरं देत नाहीत म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांना कोर्टाने येत्या पाच दिवस म्हणजेच 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सूरज चव्हाण यांचे कोणा एका राजकीय व्यक्तींशी संबंध आहेत म्हणून त्यांना आरोपी म्हणता येणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

कोविड काळात, गरीब आणि स्थलांतरितांसाठी बीएमसीने खिचडीची व्यवस्था केली होती. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यू विभागान नोंदवली होती. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यासह अनेक बीएमसी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ईओडब्ल्यूच्या तपासासोबतच ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला. ईडीने खिचडी घोटाळ्यासंदर्भात सूरज चव्हाण यांच्यासह बीएमसीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणी अखेर सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?