राजकारण

'कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है'

राज्यसभेच्या निकालावर सुप्रिया सुळे यांची सूचक प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात चांगलेच राजकीय नाट्य पाहायला मिळालं. भाजपने (BJP) आपले तीनही उमेदवार विजयी करत शिवसेनेला (Shivsena) धोबीपछाड दिला आहे. कभी कभी अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा. शरद पवार म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती. परंतू, त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते इनटॅक्ट राहिली. मात्र, जे अपक्ष आमच्यासोबत नव्हते. ते आमच्यासोबत आले नाहीत. आम्ही याबाबत बसून चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच, या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हा देखील प्रश्न आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. या निकालाने धक्काही बसला नसल्याचे म्हंटले आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी