राजकारण

साडीच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण; चित्रा वाघ यांनांही प्रत्युत्तर, म्हणाले...

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्या सुप्रिया सुळे पुण्यातील पिंपरी येथील पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात उपस्थित होत्या

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्या सुप्रिया सुळे पुण्यातील पिंपरी येथील पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात उपस्थित होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांमधील महिलांनी साडी नेसावी, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते. यावरुन भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही सुळेंवर टीकास्त्र सोडले होते. याचे प्रत्युत्तर आज सुप्रिया सुळेंनी दिले आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हंटले की, मी फक्त माझं मत मांडलं. कोणी काय घालावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, हे सुद्धा म्हटले होते. माझे भाषण नीट ऐका. थोडा वेळ पाहून ऐका. त्यात मी काय म्हंटले आहे. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि ते करत आहेत. निंदकाचे घर असावे शेजारी, असा टोलाही त्यांनी चित्रा वाघ यांना लगाववला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. 'टिकली'वर टीका करणारे 'साडी'वर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या, असे ट्विट त्यांनी केले होते.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

मला खूप वेळा गंमत वाटते की, चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलता ना तुम्ही? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टनाईजेशन करतोय, असं सुप्रिया सुळे संबंधित व्हिडीओ बोलताना दिसत आहेत.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा