लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. खासदारांच्या निलंबनानंतर लोकसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
यातच सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अमोल कोल्हे देखील दिसत आहेत.
निलंबनानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दुष्काळ आणि सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कांदा-कापूस-सोयाबीन-दूधाच्या दरांचा प्रश्न सरकारला विचारायचा नाही तर कुणाला विचारायचा? शेतकऱ्यांचं म्हणणं जर सरकारपर्यंत मांडायचंच नसेल, बेरोजगारांची घुसमट सरकारला ऐकायचीच नसेल, महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न या सरकारला ऐकायचेच नसतील तर ते मांडायचेच नाहीत का ? आणि जर हे प्रश्न मांडले तर ते सभागृहातून बाहेर काढतात.