अमोल धर्माधिकारी | बारामती : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकारांवर टीका केल्याने राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. त्यांच्यावर भाजप-शिंदे गटाकडून निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, याबद्दलच्या गोष्टी अनेक वेळा झाल्या आहेत. नवीन काहीच नाही. विरोधक पुन्हा जुन्या गोष्टी उकरून काढत आहेत. याच्यावर अनेक वेळा चर्चा झालेली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याबद्दलच्या गोष्टी अनेक वेळा झाल्या आहेत. नवीन काहीच नाही. विरोधक पुन्हा जुन्या गोष्टी उकरून काढत आहेत. याच्यावर अनेक वेळा चर्चा झालेली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीसांनी एक भाषणात बदला घेतला, असे म्हंटले होते. या विधानाचा समाचार सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे. भाजपचे एक मोठे नेते म्हणाले की हो मी बदला घेतला. फडणवीसांच हे विधान धक्कादायक होते. माझ्यावर असे संस्कार झाले नाहीत, यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. विरोधक हा वैचारिक विरोधक असतो. त्यात बदल्याची भाषा नसते. बदल्याची भाषा पहिल्यांदाच मी महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकली हे दुर्दैवी आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
दरम्यान, राहुल गांधीच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी कडाडून टीका केली आहे. अंदमानमध्ये सावरकर गेले नसते, तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती किंवा ते वेडे झाले असते. राहुल गांधी यांना सावरकरांचा स देखील माहीत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.