विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुरंदर-हवेली मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुरंदर विधानसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते संभाजी झेंडे यांच्याकडून पुरंदर विधानसभेच्या जागेवर दावा करण्यात आला होता. यावर आता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी नाही आहे. माझ्यातरी कानावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही आली.
काही पदाधिकाऱ्यांची मागणी जरुर आहे. वैयक्तित मला या बाबतीत कुणीही भेटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे अर्थातच आघाडीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पाळेल.
ज्या महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत. त्याच्यात महाविकास आघाडीचं महाराष्ट्राचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करत आहेत. एकत्र आम्ही 288 जागा लढतोय. त्यामुळे सगळे निर्णय त्या बैठकांमध्ये होतील आणि त्याप्रमाणेच सीट वाटप होईल. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.