नागपूरमध्ये आयोजित उद्योगांसंदर्भातील एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली असून नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.
नितीन गडकरी म्हणाले की, गुंतवणुकदारांनी सरकारच्या भरोशावर राहू नये, अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गडकरी साहेब हे सत्तेमध्ये आहेत. महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचा विचारांचा पक्ष आहे. त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त माहिती आतली माहिती असणार, त्याच्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात.
त्याच्यानंतर पहिल्यांदा अशी भिती किंवा वास्तव बाहेर येतेय आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिन सरकार आहे. कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करुन ठेवली आहे. त्यांना कामांसाठी वेळ नसतो. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.