Supriya Sule  
राजकारण

Supriya Sule: एजन्सीचा गैरवापर करुन विरोधी पक्ष फोडणे, घरं फोडणे हे पाप सातत्याने अदृश्यशक्ती करते

'2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकातून खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकातून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ‘ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपबरोबर गेलो. ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी पुनर्जन्मच झाला" असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा या पुस्तकातून दावा करण्यात आला आहे.

यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एजन्सीचा गैरवापर करुन विरोधी पक्ष फोडणे, घरं फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी सातत्याने अदृश्यशक्ती करते आहे. भुजबळ साहेबांचं कुटुंब, नवाब मलिकांचे कुटुंब, संजय राऊतांचं कुटुंब, अनिल देशमुखांचे कुटुंब हे सगळे कशातून गेलं, त्यांचे कुटुंब कशातून गेलं हे मी पाहिलेलं आहे.

वॉशिंग मशीनच्या माध्यमातून ज्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले आहेत. त्याच लोकांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करते. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय