Supriya Sule Team Lokshahi
राजकारण

OBC Reservation : 'भाजपावर अंधश्रद्धा कायद्यानुसार कारवाई करण्याची गरज'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपाने आज मोर्चा काढला असून शाप देत आहेत हे हास्यास्पद आहे. परंतु, अंधश्रद्धेला पुरोगामी महाराष्ट्रात थारा नाही. यावर अंधश्रद्धा कायद्यानुसार कारवाई करण्याची गरज आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनाचे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलने आयोजित केले आहे. यावेळी त्या बोलत होत्या.

'इम्पिरिकल डेटाबाबत मागील राज्य सरकारने काहीच काम केले नाही'

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, १९९४ साली शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्री असतानाच घटना दुरुस्ती झाली. तर इम्पिरिकल डेटा (empirical Data) गोळा करा, हा मुद्दा सर्वप्रथम संसदेत समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी मांडला. केंद्र सरकारने ही माहिती गोळा केली. पण, मागील राज्य सरकारने काहीच काम केले नाही, अशीही टीका त्यांनी केली, पण, महाविकास आघाडी निर्णय घेणार व भुजबळ हेच मार्गदर्शक असतील, असेही सुळे यांनी सांगितले.

'इम्पिरियल डाटावर केंद्र दिशाभूल करत आहे'

केंद्र सरकारवर टीका करताना २०१६ साली केंद्राने ९८ टक्के योग्य डाटा असल्याचे संसदीय समितीला सांगितले. तर, २०२२मध्ये लोकसभेत डाटा नाही, असे सांगितले. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात मात्र डाटा आहे. पण, त्याची विश्वासार्हता नसल्याची भूमिका घेतली. एकाच गोष्टीवर तीन वेगवेगळ्या भूमिकेमुळे केंद्र दिशाभूल करत आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे. दरम्यान, इम्पिरियल डाटा गोळा करण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही वित्तमंत्र्यानी दिली आहे, अशीही माहिती त्यांनी आज दिली.

'मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री केंद्रात कुणाला तरी भेटले अन्...'

मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येतो. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मध्य प्रदेश व महाराष्ट्र ओबीसी आरक्षणासंदर्भात एकत्र लढणार होते. पण, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री केंद्रात कुणाला तरी भेटले आणि दोन दिवसांत निर्णय झाला, असे त्यांनी सांगितले. याचा शोध मी केंद्रात घेणार असल्याचेही सुळेंनी म्हंटले आहे.

'भाजप अंधश्रद्धा कायद्यानुसार कारवाई करण्याची गरज'

भाजपाने आज मोर्चा काढला असून शाप देत आहेत हे हास्यास्पद आहे. परंतु, अंधश्रद्धेला पुरोगामी महाराष्ट्रात थारा नाही. यावर अंधश्रद्धा कायद्यानुसार कारवाई करण्याची गरज आहे, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात वेगळेच काही सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही घडले तर शरद पवार यांच्यावर नाव घेतात. पण, ते ३०३ आहेत आणि आपण फक्त ५ म्हणजे आपली ताकद किती आहे, हे समजून जा. त्या पुढे म्हणाल्या, कौरव आणि पांडव कथा सगळ्यांनाच माहित आहे. कौरवांना सळो की पळो केलं होते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मनसेसह भाजपाला दिला आहे.

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग