अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. फडणवीसांवर विरोधकांकडून टीकेची राळ उठविण्यात येत आहे. अशातच सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नवले पूल अपघात घटनास्थळाची सुप्रिया सुळे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यपाल यांच्यावर टीका करणे आपली संस्कृती नाही. पण, ते बोलतात. छत्रपतींचा अपमान करण्याचे पाप राज्यपालांनी केलं आहे. राज्यपाल परत परत चूक करत आहेत. याचा अर्थ ते जाणून-बुजून केलं जातं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला राज्यपालांमुळे काळ बोट लागलं आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
आम्ही केलं तर चूक आणि त्यांनी केलं मनात तस नसत म्हणायचं. डबल भूमिका ते घेत आहेत. देवेंद्र फडणवीस आपसे ये उमीद न थी. बिचारे दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला असेल आणि त्यांनी राज्यपालांची पाठराखण केली. छत्रपती यांचा अपमान झाला तरी मुख्यमंत्री पद भूषविलेल्या फडणवीसांनी पाठराखण करणे दुर्दैवी आहे. यापुढे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही..
तर, सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात त्या चॅनेलवाले साडी का घालत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुळेंवर निशाणा साधला. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हंटले की, भाषण नीट ऐका. थोडा वेळ पाहून ऐका. त्यात मी काय म्हटले आहे. टीका करण्याचा अधिकार सर्वांना ते करत आहेत, निंदकाचे घर असावे शेजारी, असा टोलाही त्यांनी चित्रा वाघ यांना लगाववला आहे.
श्रध्दा वालकर हत्याकांडाविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आजच मी एक ट्विट केलं आहे श्रद्धाची केस फास्ट ट्रक कोर्टात चालवली पाहिजे, अशी विनंती राज्य आणि केंद्र सरकारला केली आहे. त्यावर कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्र पोलिसावर विश्वास आहे ते काम चांगलं करतील, असे त्यांनी सांगितले आहे.