राजकारण

उद्धव ठाकरेंना पाहिलं की...; काय म्हणाले सुनील राऊत?

Published by : Team Lokshahi

मुंबई: आमच्याकडे कोणीही अस्थिर नाही आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे निष्ठावान शिवसैनिक आहोत, असे सुनिल राऊत म्हणाले.

उद्धव साहेबांना पाहिलं तर आम्हाला एक एनर्जी येते आताही एनर्जी घेऊन आम्ही आमच्या विभागात जाणार आणि पुन्हा एकदा शिवसेना मजबूत करण्याचं काम आज पासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उध्दव ठाकरेंनी योग्य असे मार्गदर्शन केलं. पक्ष आपला मजबूत आहे. संघटना मजबूत आहे. आणि शिवसेनेची सत्ता कुठल्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेत आणि महाराष्ट्रात येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपण आपल्या पद्धतीने काम करा, लोकांशी संपर्क वाढवा, असा सल्ला उध्दव ठाकरेंनी बैठकीत दिला असल्याचे सुनील राऊतांनी सांगितले.

शिंदे गटात कोण गेलं बाळासाहेबांवर प्रेम करणारा निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे सोबत आहे. आमची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे. त्यामुळे आम्हाला चिंता करायची गरज नाही. जे गेले ते उपरे होते ते गेले, अशी टीका त्यांनी केली आहे.

Women's T20 WC 2024: आयसीसीने T20 विश्वचषकासाठी स्पेशल थीम सॉन्ग केले लॉन्च

Sharad Pawar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; शरद पवारांचं ट्विट करत सवाल...

Chitra Wagh: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Amol Mitkari: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Varsha Gaikwad: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया