वर्धा (भूपेश बारंगे) :- वर्धा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे.यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शेतकऱ्यांची शेती अक्षरशः भुईसपाट झाली आहे.अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पंचनामे करून मदत द्यावे असे निर्देश माजी पशुसंवर्धन मंत्री तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहे.वर्ध्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पाहणी करण्याकरिता माजी मंत्री, माजी पालकमंत्री सुनील केदार यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या समितीसोबत वर्धा जिल्ह्यात काही गावांची पाहणी दौरा केला. (Sunil Kedar inspected the damaged area; Congress leaders on farmers' dam in Wardha district)
या भागात दिल्या भेटी शेतकऱ्यांशी बांधावर साधला सवांद
समुद्रपूर तालुक्यातील समुद्रपूर, शेडगाव, मांडगाव, सावंगी झाडे, हिंगणघाट तालुक्यातील नंदोरी, टाकळी, निधा, हिंगणघाट शहर येथे पाहणी दौरा केला.अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी,असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.यावेळी काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, सुधीर कोठारी तसेच गावातील सरपंच ,नागरिक आदी उपस्थित होते.
काँग्रेसची अतिवृष्टी पाहणी समिती जिल्ह्यात दाखल; आष्टी,कारंजा आर्वी तालुक्याची पाहणी करणार
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करण्याच्या उद्देशाने सोमवारी काँग्रेसची अतिवृष्टी पाहणी समिती माजी पशुसंवर्धन मंत्री तसेच माजी पालकमंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली वर्ध्यात दाखल झाली.त्यांनी पाहिल्या दिवशी नुकसान ग्रस्त समुद्रपूर ,हिंगणघाट तालुक्यातील गावांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात समितीचे आमदार रणजित कांबळे, जिया पटेल यांच्या सह सदस्य, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, अशोक शिंदे, सुधीर कोठारी यांची देखील उपस्थिती होती. राज्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे.मोठ्या प्रमाणात गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी वीज पडून तर पुरात वाहून माणसे मृत्युमुखी पडली.
कित्येक जनावरे दगावली.या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळ बागायतीचे फार मोठं नुकसान झाले आहे.या पाहणीचा अहवाल मदातमिळण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. वर्धा जिल्ह्यात दाखल झालेली पाहणी समिती यांनी हिंगणघाट, समुद्रपूर भागाचा दौरा केला. तर आष्टी,आर्वी,वर्धा, कारंजा या तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने कुटुंब स्थलांतर करण्यात आले होते.या तालुक्याची बुधवारी पाहणी करून सर्व नुकसानीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या संपूर्ण नुकसानीची पाहणी केली जात आहे. असे सांगण्यात आले.
याप्रसंगी मा. रणजित कांबळे, आमदार देवळी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अड. सुधीर कोठारी,अशोक शिंदे माजी राज्यमंत्री, झिया पटेल, मा. मनोज चांदूरकर, अध्यक्ष, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी प्रविण उपासे, अध्यक्ष, किसान , काँग्रेस, पंढरीनाथ कापसे माजी नगराध्यक्ष, बालु महाजन हिंगणघाट तालुका अध्यक्ष काँग्रेस संदीप देरकर, समुदपूर शहर काँग्रेस अध्यक्ष डॉ. रामकृष्ण खुजे, श्याम देशमुख, राजू भाऊ मंगेकर, सरपंच, सिरासगवयांची उपस्थिती होती.