कोविड घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक करण्यात आली आहे. बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचाही आरोप ईडीनं केला आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत अनेक ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते.
बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने सुजीत पाटकर यांना अटक केली आहे.