पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी एक घटना घडली होती. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याच सगळ्या प्रकरणावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील हिट अँड रन केसवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पुण्यातील हिट अँड रन केसकडे राजकीय दृष्ट्या बघायची गरज नाही आहे तर ती एक मस्तावाल मुलाने केलेली चूक आहे जी माफ करण्यासारखी बिल्कुल नाही आहे. पुणे अपघात प्रकरणात माजलेल्या बापाच्या मुलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने जो आदेश दिला, त्याचं पालन झालंच पाहिजे असं संजय शिरसाट म्हणाले.
अल्पवयीन आहे म्हणून दारू प्यायला, अल्पवयीन आहे म्हणून विना परवाना गाडी चालवत होता, खरंतर दारू पिणारे लोकं कुठेही जाऊन काहीही करू शकतात. अशा श्रीमंत लोकांच्या माजलेल्या मुलांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे याला पक्ष नाही, याला जात नाही, याला धर्म नाही. कोणत्याही गरिबाच्या, सर्वसामान्याच्या शरीरावर गाडी चालवायची, आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. तसंच या अपघाताची एसआयटी मार्फतही चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही शिरसाट यांनी केली.