शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाबाबत महत्त्वाचा निर्णय दिली. या निर्णयात अयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह दिले. या निर्णयामुळे शिंदे गटात आणि ठाकरे गटात आता वाद आणखीच उफाळला आहे. ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली. याच निर्णयावर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अजब वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
शिवसेनेबाबत दिलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, देवावर राजकारण केल्याने उद्धव ठाकरे हे पक्ष आणि चिन्हाची लढाई हरले आहेत. त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमवावे लागले. खरंतर भगवान शंकराचे सहावे ज्योतिर्लिंग अशी ख्याती असलेले भीमाशंकर कुठे आहे यावरून दोन राज्यांमध्ये वाद आहे. भगवान शंकराचे वास्तव्य हिमालयात असते. त्यांना कुठल्याही विशेष स्थानापर्यंत सीमित करता येणार नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्ष शंकराच्या नावावर राजकारण करतो आहे. याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिरावले गेले आहे. असे विधान त्यांनी यावेळी केले आहे.