uddhav thackeray sharad pawar Team Lokshahi
राजकारण

Sharad Pawar : राज्यसभेत अतिरिक्त ११ मते शिवसेना उमेदवारास देणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत शरद पवार यांचे विधान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर महापलिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही लवकरच पार पडणार असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसची (NCP) आज बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाच्या सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

राज्यसभा निवडणूक

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विजयासाठी आवश्यक ४२ मतेच देणार असून अतिरिक्त ११ मते शिवसेना उमेदवारास देणार असल्याचे सांगितले आहे. तर, प्रफुल्ल पटेल यांना ४७ मते देणार ही निव्वळ अफवा असल्याचेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका निवडणूक

मुंबई महापालिका निवडणूक पूर्व बैठका सुरू करा, मंत्र्यांचे जनता दरबार लावण्याचे आदेश शरद पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिले आहे. सोबतच, राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हे नंतर ठरेल. पण, तयारीला लागण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत.

राज्यातील आगामी घोषित झालेल्या चौदा महापालिकांमध्ये आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू करा, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांबरोबर चर्चा सुरु करा व आघाडी करण्यासाठी आवश्यक तरतुदी समजून घ्या, अशाही सूचना शरद पवार यांना देण्यात आल्या आहेत.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरही चर्चा करण्यात आली असून प्रत्येक मंत्र्यासह बड्या नेत्यांवर जिल्हानिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकांच्या जबाबदारीचे मंत्र्यांना वाटप

अजित पवार : पुणे, पिंपरी चिंचवड

जितेंद्र आव्हाड : ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, उल्हासनगर

प्रफुल्ल पटेल व दिलीप वळसे पाटील : नागपूर, अमरावती, हसन मुश्रीफ, कोल्हापूर

छगन भुजबळ : नाशिक

दत्ता भरणे : सोलापूर

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय