devendra fadnavis | BMC  Team Lokshahi
राजकारण

मुंबई महापालिकेच्या घोटाळ्यांची चौकशी करणार, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या...

महापालिकेत कॅगचे विशेष ऑडिट केले जाणार

Published by : Shubham Tate

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करु, अस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 260 अन्वये राज्यातील कृषी क्षेत्र आणि पूरपरिस्थिती यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. 22 ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये सततचा पूर, अतिवृष्टीमुळं 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. याचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली आहे. (special cag audit bmc says devendra fadnavis)

तसेच मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे, त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचताना दिसत आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेत गेल्या दीड वर्षात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार असं मत मांडत त्यांनी विधानसभेत शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

दरम्यान, याआधीच भाजप आमदारांनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही केली होती. त्याची गंभीर दखल घेत फडणवीसांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे महापालिकेत कॅगचे विशेष ऑडिट केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड