नवी मुंबईमध्ये महापालिका हद्दीतील एमआयडीसीचे भूखंड विक्रीस काढण्याचा घाट काही दलालांनी सूरू केल्याचा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. या भूखंडांना वाचवण्यासाठी भाजपा आमदार गणेश नाईक यांनी आज भूखंडांवर जाऊन वृक्षारोपण केले. तसेच वेळ पडल्यास हे भूखंड वाचविण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला.
नवी मुंबई मध्ये महापालिका हद्दीत एमआयडीसीच्या मालकीचे असणारे भूखंड वाचविण्यासाठी भाजपा आमदार गणेश नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी एमआयडीसीच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावर आमदार गणेश नाईक यांनी वृक्षारोपण केलंय. शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोक्याच्या जागी असणारे भूखंड महत्वाची भूमिका बजावतात.मात्र हे भूखंड विक्रीस काढण्याचा घाट काही दलाल एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमताने घालत असल्याचा आरोप नाईकांनी केलाय. यंदा फक्त वृक्षारोपण करण्यासाठी आलोय मात्र वेळ पडल्यास हे भूखंड वाचविण्यासाठी आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलीय.