संगमनेर : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीवरुन राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अशातच, बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहिर केला आहे. परंतु, शुभांगी पाटील यांना संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी प्रवेश नाकारण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
नाशिक पदवीधरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील सध्या प्रचारार्थ संगमनेर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान बाळासाहेब थोरात फोन करुन शुभांगी पाटील भेटीला गेल्या. परंतु, शुभांगी पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. शुभांगी पाटील या सुदर्शन निवासस्थानाच्या गेटवरूनच माघारी पाठवण्यात आले.
भारत जोडो यात्रेपासून सत्यजीत तांबे यांना बाजूला ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे. हे मामा बाळासाहेब थोरात सर्व जवळून पाहात होते. अशातच, बाळासाहेब थोरात शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ येणार असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले होते. परंतु, बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शुभांगी पाटील यांनी प्रचारादरम्यान विजय हा माझाच होईल व जे घरच्यांचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार, असा घाणाघात केला आहे. संगमनेरमध्ये त्यांनी आपल्या प्रचारार्थ शहरातील सय्यदबाबा दर्गा येथे फुलांची चादर चढवली आहे.