राजकारण

Shrikant Shinde: गोऱ्हे, कायंदे, सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते आपल्याला का सोडून जातात ?

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Published by : Siddhi Naringrekar

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले की, निवडणुका व्हायच्या तेव्हा त्या होतील मात्र, आपल्याला लोक का सोडून जात आहेत, याचा विचार कधी करणार आहात की नाही. इतकी लोकं सोडून गेली याचे आत्मपरीक्षण करा, नेमकं ते आपल्याला का सोडून जातात ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची मोडतोड केली. त्यानंतर इतके लोक आपल्याला सोडून जातात.

नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, मंगेश सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते सोडून जातात याचे आत्मपरीक्षण करणार की नाही. कोणी कुठेही मेळावा घेऊ शकतो. त्याच्याबद्दल मी काय बोलणार ? मेळाव्यामध्ये ते काय बोलले ते मला माहिती नाही. आपला पक्ष वाढवायची मुभा ही सर्वांना आहे. असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Diwali 2024: लक्ष्मी पूजनाला झेंडूची फुलं का वापरतात?

महाविकास आघाडीच्या प्रचाराला 6 नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी म्हणाल्या...

झेंडूचं फुल: आरोग्यासाठी फायदेशीर आणि लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक; जाणून घ्या

LPG Price Hike: ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका! गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; जाणून घ्या दर