Sanjay Raut | Shrikant Shinde Team Lokshahi
राजकारण

संजय राऊतांची खूप काळजी वाटते, महाराष्ट्राला तुमची गरज; असे का म्हणाले श्रीकांत शिंदे?

श्रीकांत शिंदे यांनी लगावला संजय राऊतांवर टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मयुरेश जाधव | मुंबई : संजय राऊत यांनी आपल्याला मारण्यासाठी राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर केला होता. या आरोपावर श्रीकांत शिंदे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचे आरोप हास्यास्पद आहेत. मला संजय राऊत साहेबांची खूप काळजी वाटते. त्यांना मानसिक आजार झाला आहे, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे. अंबरनाथच्या पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.

एकीकडे ते पोलिसांना चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र देतात, दुसरीकडे आपल्या जबाबात तेच म्हणतात की, माझ्यावर शाईफेक केली जाईल किंवा धक्काबुक्की केली जाईल. आणि त्यांचे सहकारी सहायक संपादक चिंधरकर यांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. मी त्यांना फक्त काळजी घ्या, असे सांगितले होते.

मी कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा काय करणार हे सांगितले नव्हते, असे चिंधरकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. संजय राऊत यांचा आरोप आणि त्यांच्या जबाबत विरोधाभास आहे. पोलिसांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

मला संजय राऊत यांची मला काळजी वाटते. मला त्यांच्या बद्दल सहानुभूती आहे. मी हाडांचा डॉक्टर असलो तरी वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार होतोय का? अशी लक्षणं दिसू लागली आहेत. आभासी जग आणि वास्तविक जगात त्यांनी गल्लत केली आहे.

एका आभासी जगात ते आज रहात आहेत.रुग्णाला भास होतात. एका काल्पनिक जगात रहात आहेत आणि काल्पनिक गोष्टींचा विचार करत आहेत. संजय राऊत यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांची महाराष्ट्राला गरज आहे. कारण संजय राऊत यांच्यामुळे महाराष्ट्रातील जनेतेचे सकाळचे मनोरंजन होत आहे. पाहिजे तर मी चांगला डॉक्टर सुचवू शकतो, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना पुन्हा टोला लगावला.

पुण्यात मनसेला मोठा धक्का; सरचिटणीस रणजित शिरोळेंचा मनसेला जय महाराष्ट्र

Sulbha Gaikwad यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कल्याणमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

नरहरी झिरवळ यांचं शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले...

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून रोहित पवार यांच्या 'या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण