Uddhav Thackeray | Jayant Patil team lokshahi
राजकारण

उद्धव ठाकरेंना आपली ताकद दाखवा, जयंत पाटलांची जळगाव पदाधिकाऱ्यांना तंबी

मतदारसंघात जास्तीत जास्त सभासद करण्याची तंबी

Published by : Shubham Tate

Jayant Patil on Uddhav Thackeray : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी होणार व त्यामध्ये जर आपल्या मतदार संघात सभासद संख्या कमी असेल तर त्या जागेवर उद्धव ठाकरे म्हणतील की या ठिकाणी आमचा उमेदवार द्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपली ताकद दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त सभासद करण्याची तंबी यावेळी दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावात पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. (Show your strength to Uddhav Thackeray, Jayant Patil to Jalgaon officials)

राज्यात नुकत्याचं महापालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका जाहिर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. कार्यकर्तांबरोबर नेते मंडळी देखील आपल्या पक्षाला जास्तीत जास्त उमेव्दार कसे देता येतील यावर भर देताना दिसत आहेत. त्याच अनुशंगाने रस्सीखेच पहायला मिळत आहे. राज्यात नुकतचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडणार का हा प्रश्न चर्चेत होता. अशात पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये किंवा पक्षांमध्ये फूट पडली नसल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्षांपुढे राज्यातील अनेक भागात उमेद्वार देताना अडचणी निर्माण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उमेद्वार देखील आपल्या पदरात उमेद्वार पाडण्यासाठी कसोटीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे उमेद्वार यादी जाहिर झाल्यानंतरच अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत. मात्र आजच्या जयंत पाटील यांच्या विधानाचे अनेक अर्थ राजकीय वर्गातून निघत असल्याचे दिसत आहे.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय