यंदाच्या दसरा मेळाव्याचा वाद हा न्यायालयात जाऊन थांबला. दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर कोणत्या गटाचा मेळावा होणार याचा निर्णय न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने दिला. शिंदेगटाने बीकेसी येथील MMRDA मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी मिळवली आहे. मात्र, शिंदेगटाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
युवासेना करणार राज्यपालांकडे तक्रार:
यंदा दसऱ्याला 5 ऑक्टोबर रोजी शिंदेगटाचा दसरा मेळावा होणार आहे. हा मेळावा बीकेसी येथील MMRDA मैदानात होणार आहे. मात्र, या मेळाव्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्णयाला युवासेना विरोध दर्शवत आहे. या निर्णयाविरोधात युवासेना राज्यपालांकडे तक्रार देखील दाखल करणार आहे.
युवासेनेसह राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना व छात्र भारती संघटनाही आक्रमक:
कलिना विद्यापीठातील चित्रनगरी मैदान, नॅनो सायन्स जवळील मोकळी जागा, कुलगुरू निवासस्थानासमोरील मोकळी जागा ही दसरा मेळाव्याच्या वाहनतळसाठी देण्यात येणार आहे. विद्यापीठाची जागा ही राजकीय कार्यक्रमासाठी वापराला देऊ नये म्हणून ष्ट्रवादी विद्यार्थी संघटना व छात्र भारती संघटनाही आक्रमक झाली आहे.