राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी त्यांची बुधवारी कारागृहातुन सुटका झाली. याच सुटकेनंतर शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले संजय राऊत?
आमदार अनिल देशमुख निष्कलंक असून त्यांना गेल्या 30 वर्षाची त्यांची कारकीर्द असल्यामुळेच त्यांची न्यायालयाने सुटका केली. पुढील काही दिवसात आता हळूहळू सगळं बाहेर येणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले की, आमच्या सर्वांचं एक कुटुंब आहे. कोणही शत्रूशी असे निर्घृण वागत नाही तसे हे लोके वागत आहेत. न्याय देवतेने दिलेला निकाल पाहता, लोकशाहीतील हा एक खांब खंबीर न्यायालयाने निकाल देताना याबाबतची निरीक्षणं गंभीरपणे नोंदवली गेली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.