Sanjay Gaikwad Team Lokshahi
राजकारण

'तेव्हा तुझी गोधडीत झोपले' संजय गायकवाडांचे ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

ज्या लोकांसोबत तुम्ही गेला त्यांनी 370 कलम हटवण्याचा निर्णय कधी घेतला का. कधी त्यांनी राम मंदिरासाठी पुढाकार घेतला का. हे सरकार धाडसाने काम करत आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद आणखीच तीव्र झाला आहे. या वादादरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. त्यावरच आता शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर देत विखारी टीका केली आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, बाळासाहेब यांनी जो शिवसैनिक घडविला तो सच्चा शिवसैनिक आम्ही आहोत. जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यासोबतचे आहेत. आता कडवट म्हणणारे कधीच काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करू शकत नाही. जो बाळासाहेबांच्या विचारांचा असेल तोच भगव्या झेंड्याखाली काम करेल. उगाच निष्ठेचा आव आणू नये. हे हुकुमशाही सरकार नाही. धाडसाने निर्णय घेणारे सरकार आहे. म्हणून या देशात भाजपासोबत आहोत. ही मूठभरांची संख्या नाही तर अथांग सागर आहे. या सागराने आता एक एक राज्य व्यापायला सुरुवात केली. असे गायकवाड म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, जे बोलले त्यांना माझा सवाल आहे की, जेव्हा आम्ही बाळासाहेब सोबत काम करत होतो तेव्हा तुझी गोधडीत झोपले होते. तेव्हा तुमचा राजकीय जन्म पण नव्हता. तुमच्या राजकीय जन्मापासून आम्ही रक्त सांडले. तुळशीपत्र घरावर ठेऊन बाळासाहेबांसोबत पक्ष वाढविला. तुम्ही तेव्हा होता कुठं? पण ज्या लोकांसोबत तुम्ही गेला त्यांनी 370 कलम हटवण्याचा निर्णय कधी घेतला का. कधी त्यांनी राम मंदिरासाठी पुढाकार घेतला का. हे सरकार धाडसाने काम करत आहे. आम्ही मूठभर नाही तर तुम्ही येणाऱ्या काळात मूठभर शिल्लक राहणार आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका