राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु असताना, दुसरीकडे मात्र, शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना(ठाकरे गटाला) मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेते पदावरून त्यांची हक्कालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर ठाकरे गटाकडून देखील त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी किर्तीकर यांच्यावर विखारी टीका केली आहे.
काय म्हणाले खैरे?
गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यावर बोलताना खैरे म्हणाले की, गजाभाऊंनी पक्ष सोडला याचे मला खूप दु:ख आहे. ते आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात औरंगाबाद आणि जालन्यात शिवसेनेसाठी खूप काम केले. त्यांनी आम्हाला घडवले. त्यांना पक्षात काही गोष्टी खटकत होत्या तर त्यांनी सांगायला पाहिजे होते. पक्षात राहून मत मांडायला हवे होते. अशा गोष्टींसाठी पक्ष सोडल्याने मला खूप दु:ख झालंय, अशी खंत यावेळी खैरे यांनी व्यक्त केली.
गजाभाऊंनी बाळासाहेबांसोबत काम केलं होतं. दोनदा खासदार झाले होते. पक्षाने त्यांना पाचवेळा आमदार केलं होतं. मंत्रीपदही दिलं होतं. अजून काय हवं होतं. पक्षाने इतकं दिल्यानंतरही या वयात ते गद्दारांच्या बरोबर गेले. हे मला पटलं नाही." अशी भावना त्यांनी त्यांनी व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले की, पक्षात राहून मतं मांडायची असतात. पश्र नेतृत्वाला फोर्स करायचा असतो. पण ते कधीच बोलले नाही. आताच त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी कशी आठवली? अडिच वर्ष राज्यात आघाडीचं सरकार होतंच ना? त्यावेळी का बोलले नाही? आघाडीचं सरकार आलं तेव्हा पहिल्याच दिवशी बोलायला हवं होतं? उगाच गजाभाऊंना म्हातारपणात म्हातारचळ लागलं आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.