राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते परतीची पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज दौऱ्यावर आले आहे. मात्र, त्या दौऱ्याआधी कृषीमंत्री शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी टीका केली होती. आता सत्तारांच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले खैरे?
कृषीमंत्र्यांना उत्तर देतांना खैरे म्हणाले की, ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम केले आज तेच त्यांच्यावर टीका करत आहेत. चार पक्ष फिरून आलेल्यांचा आम्ही बंदोबस्त आम्ही करू. आदित्य ठाकरे फिरलेत, आमदार, खासदार फिरले, मविआ नेते, विरोधी पक्षनेते राज्यभर फिरत आहेत. आता कितीही काही झालं तरी आता बस झाल, तोंड सांभाळा नाहीतर आम्ही कायदा दाखवून देऊ, असा इशारा खैरे यांनी सत्तारांना दिला आहे.
काय म्हणाले होते सत्तार?
उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची ते पाहणी करत आहे. पण उद्धव ठाकरे 24 मिनिटांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी कशी पाहणी करणार, अशी टोला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला होता.