राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच रत्नागिरीमध्ये ठाकरे गट नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सध्या सुडाचाच कारभार सुरू आहे. सूडाच्या पाठीमागे प्रेरणा, महत्त्वाकांक्षा भाजपची आहे. अश्या शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
काय म्हणाले जाधव?
माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, सत्ता परिवर्तन हेच मुळात विश्वासघाताने झालेलं आहे. सध्या सुडाचाच कारभार सुरू आहे. सूडाच्या पाठीमागे प्रेरणा, महत्त्वाकांक्षा भाजपची आहे. सत्तेचा माज, आणि सत्ता किती डोक्यात भिनलेली आहे त्याचं प्रदर्शन आणि दर्शन सध्या घडत आहे. अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. लोकशाही ही सर्वश्रेष्ठ आहे, जनता हाच लोकशाहीमध्ये राजा आहे, संधी येतात, वेळ येते, जनता या सूडाच्या प्रवासाचं उत्तर लोकशाही मार्गाने देईल. असे विधान त्यांनी यावेळी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, आमचे 40 आमदार हे भाजप एकत्र ठेऊ देणार नाही, याचा अंदाज शिंदे गटाला आलेला असावा. आमच्या काही आमदारांना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल, 2019 मधील ती पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पुन्हा दाखवावी म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल की, देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात की खरं बोलतात. असा सल्ला भास्कर जाधक यांनी यावेळी दिली आहे.